Uncategorized

डॉ सुवर्णा वाजे मृत्यु प्रकरणी धक्कादायक खुलासा, कौटुंबिक वादातून पतीने केला खून ?

Share Now

नाशिक शहरात धक्कादायक घटना घडली होती महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी महिलेचा मृतदेह कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृतावस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. परंतु या खुनाचा आज उलगडा झाला आहे. सुवर्णा वाजे यांच्या पतीने खून केल्याचा खुलासा झाला आहे.

सुवर्णा वाजे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत कारमध्ये आढळून आला होता. या घटनेत घातपात की दुर्घटना या दृष्टीने पोलीस तपास करत होते. परंतु डीएनए चाचणी नंतर वाजे याचा घातपात झाल्याचे समोर आले. पोलिसाना मारेकऱ्यांला शोधण्यात यश आले आहे. डॉ सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे याने कौटुंबिक वादातून हत्या केल्याची माहिती समोर आली. मात्र संदीप वाजे आणि डॉ सुवर्णा वाजे यांच्यामध्ये काय वाद होता अद्याप तरी समोर आले नाही.

सुवर्णा वाजे मंगळवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घरातून महापालिका रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री ९ वाजले तरी घरी न परातल्याने बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीने तिला मेसेज केला. त्यावेळी पत्नीच्या मोबाइलमधून ‘मी कामात आहे, वेळ लागेल,’ असा रिप्लाय दिला परंतु त्यानंतर मोबाईल स्विच ऑफ आला. पतीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास नाशिक मुंबई महामार्गावरील वाडीवऱ्ह गावाजवळ जळालेल्या कारमध्ये या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *