राजकारण

नितेश राणे दोन दिवस पोलीस कोठडीत

Share Now

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब याना मारहाण प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकारी वकिलांनी न्यायलीयन कोठडी मिळाल्यानंतर सरकारी वकिलांनी चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली होती.

काय आहे प्रकरण
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान शिवसेना कार्यकर्ते संतोष परब याला मारहाण केली प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कणकवलीत गुन्हा नोंदवण्यात आला होता. १८ डिसेंबर २०२० रोजी कणकवली मध्ये संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *