Uncategorized

शिवसेना माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन

Share Now

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे आज निधन झाले. गजानन बाबर ७८ वर्षाचे होते. पोटाच्या आजपणामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते, उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर निगडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार जाणार आहे. गजाजन बाबर यांच्यावर मागील दोन महिन्यापासून खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, त्याच्या तब्बेतीत सुधारणा होती.

परंतु पुन्हा अपचनामुळं त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना चिंचवडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . मात्र तब्येत खालावल्याने पुढच्या उपचारासाठी बाणेरच्या खाजगी रुग्णालयात भरती करण्या आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मावळली . गजाजन बाबर यांची १९९७ मध्ये बायपास सर्जरी झाली होती, १९९९ मध्ये गुडघ्याची शस्त्रक्रिया तर २०१४ मध्ये मणक्याची शस्त्रक्रिया ही झाली होती. या सर्व आजारपणातून ते सावरले होते. परंतु पोटाच्या आजरपणाने त्यांचं निधन झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *