नितेश राणे यांची माघार, मी स्वत: शरण होण्यासाठी कोर्टात जातोय – नितेश राणे
काल सर्वोच न्यायालयाचा जो काही निर्णय दिला त्याचा आदर ठेऊन मी स्वत शरण होण्यासाठी कोर्टात जातोय. राज्य सरकारने मला वेगवेगळ्या पद्धतीने अटक करण्याचा प्रयत्न केला असे नितेश राणे यांनी सांगितले. संतोष परब मारहाण प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कणकवली सत्र न्यायालयात नितेश राणे जाणार आहेत.
त्यासोबत नितेश राणे यांनी आज एक सूचक ट्विट केलं आहे. ” समय बडा बलवान है… ”
संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयातील अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे थोड्याच वेळात सिंधुदुर्ग तपास अधिकाऱ्यांकडे नितेश राणे शरणागती पत्करणार आहे. कालच नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं फेटाळला होता. सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना अटकेपासून १० दिवसांचं संरक्षण दिलं आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1488804496595898373?s=20&t=uzh8LED_QEODUjNCeXxQ1w