महाराष्ट्र

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयावर शरद पवार यांचं महत्वाचं विधान

Share Now

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधी पक्षाने विरोध सुरू आहे. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नाही निर्णय बदलला तर वाईट वाटण्याचे कारण नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले .

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनाची लागण झाली होती, कोरोनावर मात करून पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर भाष्य केले. राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही असे शरद पवारांनि सांगितले . सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

देशात द्राक्षाच सर्वाधिक उत्पन्न नाशिक जिल्ह्यात घेतलं जातं. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये १८ वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *