क्राईम बिटमहाराष्ट्र

रिअल लाईफ ‘पुष्पा’ महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात, २.५ कोटीचे रक्तचंदन पोलिसांनी केले जप्त

Share Now

सांगलीः पुष्पा या चित्रपटाची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल अडीच कोटीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटक असल्याचे समजते आहे.

सर्व यंत्रणा चकवा देत मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केला जाणारा पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे. याचीच प्रचिती येत आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. यामध्ये असलेल्या 2 कोटी 45 लाख 85 हजाराचे 983 किलो 400 ग्रॅम रक्तचंदनावर मिरजेत पोलीस आणि वन विभागाने धाड टाकून जप्त केले आहे. यावेळी यासिन इनायतउल्ला खान (रा. अनेकळ, जि. बंगलुरु) याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशमधील जंगलातून मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी कशी केली जाते, यावर प्रकाश टाकणारा चित्रपट पुष्पा नुकताच प्रदर्शित झाला आहे.याची मोठी चर्चा सर्वत्र चालू असतानाच अशाच प्रकारे रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक अशोक विरकर आणि सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने व वन विभागाच्या साह्याने चौकशी करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेले रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांकडून मिरज–कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावण्यात आला. कोल्हापूर जकात नाका येथे उड्डाणपूल येथे. फळ वाहतूक होत असल्याचा फलक लावून जाणारा KA 13 6900 हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता पुष्पा चित्रपट प्रमाणे फळांच्या क्रेट खाली हे रक्तचंदन लपवण्यात आले होते. त्यामध्ये 2 कोटी 85 लाखाचे 983 किलो 400 ग्रॅम चंदन असल्याचे निदर्शनास आले. ते जप्त करण्यात आले आहे. याचा कर्नाटकशी संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले तर हे रक्त चंदन नेमके आले कुठून याचा तपास सांगली पोलीस करीत आहेत.आणि याचाच आढावा घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *