newsबिझनेस

‘हे’ आहे भारताचे नवे आर्थिक सल्लागार

Share Now

देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची शुक्रवारी २८ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली. अर्थमंत्रालयाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी शुक्रवारपासून या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये के. व्ही. सुब्रमण्यम यांचा कार्यकाल संपला होता.

डिसेंबरमध्ये सुब्रमण्यम यांच्या राजीनाम्यानंतर या पदावर कुणाचीच नेमणूक करण्यात आली नव्हती. आता ही जबाबदारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांना देण्यात आली आहे. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यापूर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची नियुक्ती केली आहे.

डॉ. नागेश्वरन यांनी १९८५ मध्ये अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. तसेच त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अहमदाबाद येथून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे आणि अमहर्स्ट मॅसेचुसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी पूर्ण केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *