क्राईम बिटमहाराष्ट्र

लग्नाचं आमिष देत तब्बल दहा वर्षे लैगिक संबंध, नंतर पीडितेस जीवे मारण्याची धमकी

Share Now

नाशिक : नाशिक शहरात महिलेला लग्नाचे आमिष दाखवत दहा वर्षे लैगिक संबंध ठेवले त्यात महिला तीनवेळा गरोदर राहिली होती. त्याने तीन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ३० वर्षीय पीडित महिलेस संशयित आरोपी गणेश राजाराम भोसले याचे वय ३४ वर्ष असून महालक्ष्मी बंगलो, खोडेनगर, नाशिक येथील रहिवासी आहे. याने दि. १२ सप्टेंबर २०१२ ते दि. २१ जानेवारी २०२२ या कालावधीत वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.

संशयित गणेश भोसले याने यापीडितेस औरंगाबाद नाक्यावरील शिवगंगा हॉटेल, उपनगर येथील शालम् हॉटेल, इगतपुरी येथील मँगो रिसोर्ट, तपोवन मैदान अशोका मार्ग मैदान, आणि अशोका मार्ग येथील त्याच्या राहत्या घरी नेऊन वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यासोबतच गणेशने या महिलेला नकळत दारू पाजून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या धमक्या देखील दिल्या आहेत.

तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर अश्‍लील चॅट करून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. फिर्यादी महिलेचा विरोध असतानाही अनैसर्गिक संबंध ठेवून फिर्यादीचा लैंगिक छळ केला, तसेच फिर्यादी महिलेचा तीन वेळा जबरदस्तीने गर्भपात करून तिला व तिच्या कुटुंबीयांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. या प्रकाराला कंटाळून महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *