हृदयद्रावक ! आधी सामूहिक बलात्कार मग पीडितेचे केस कापून काढली धिंड, दिल्लीतील घटना
नवी दिल्ली : दिल्लीतून एक भयंकर घटना समोर आली आहे. कस्तुरबानगर येथे एका 20 वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. अवैध दारुची विक्री करणाऱ्यांनी या तरुणीवर बलात्कार केल्याचे म्हटले जात आहे. बलात्कारानंतर आरोपींनी पीडितेचे केस कापले. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर काळीमा फासत तिची धींड काढली. पीडितेच्या गळ्यात चप्पलांचा हार घातला.
विशेष म्हणजे बलात्कार करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या महिलांनी मिळून पीडितेची धिंड काढली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी हा प्रकार घडल्याचे आता समोर आले आहे. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कस्तूरबा नगर में 20 साल की लड़की का अवैध शराब बेचने वालों द्वारा गैंगरेप किया गया, उसे गंजा कर, चप्पल की माला पहना पूरे इलाक़े में मुँह काला करके घुमाया। मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए। pic.twitter.com/4ExXufDaO3
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 27, 2022
मिळालेल्या माहितीनुसार कस्तुरबानगर येथील एका 20 वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी सामुहिक बलात्कार केला. बलात्कार करणारे नराधम हे अवैध दारुची विक्री करत असल्याची माहिती मिळतेय. बलात्कार झाल्यानंतर कस्तुरबा नगरमधील महिलांनी पीडित तरुणीची धिंड काढली. तिच्या डोक्यावरचे केस कापले त्यानंतर तिला रस्त्यावरून फिरवण्यात आले. विशेष बाब म्हणजे यामध्ये महिलांचा देखील समावेश असल्याचं कळतंय. महिला पीडितेला धक्काबुक्की करत असल्याचेही दिसत आहे.
दरम्यान पीडित तरुणीसोबत घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी पीडित तरुणीची भेट घेतली आहे. तसेच पीडित तरुणीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीसोबत छेडछाड केल्याप्रकरणी चार महिलांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस काही आरोपींच्या शोधात आहेत. आरोपींनी जुन्या भांडणाच्या रागातून संबंधित कृत्य केल्याचा संशय पोलिसांना आहे. पीडित तरुणी ही विवाहित आहे. तसेच तिला एक लहान मुलगा देखील आहे.