अखेर निर्णय झाला, वाईन मिळणार सुपर मार्केट मध्ये, मात्र..

मुंबई : आता वाईन जर तुम्हाला किराणा, जनरल स्टोर, सुपर मार्केट मध्ये दिसली तर आश्चर्य चकित होऊ नका. कारण महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकार हा निर्णय घेतला आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. आज दिनांक २७ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या संबंधी चर्चा झाली. आणि या बद्दलचा निर्णय हि झाला. १००० चौ.मी च्या सुपर मार्केट मध्ये वाईन विकली जाणार आहे. असा ठराव यावेळी पारित करण्यात आला, या बैठकीत इतर अनेक महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, भाजपकडून या वाईन प्रस्तावाला विरोध असल्याचे देखील भाजपने जाहीर केले होते. त्यामुळे आता राज्य सरकारने वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीत झालेल्या निर्णयावर विरोधी पक्ष काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय योग्य असला तरी देखील याला कितपत प्रतिसाद मिळेल याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *