मनोरंजन

“देव माझ्या ब्राची साईज मोजतोय” – स्वेता तिवारी , गृहमंत्रालय अॅक्शन मोडमध्ये

Share Now

भोपाल : पॉप्युलर टीव्ही अभिनेत्री व बिग बॉसची गाजलेली स्पर्धक श्वेता तिवारी आपल्या लूक्स आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते. पण आता श्वेता तिवारी एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. तिने आपली ब्रा साइज आणि देवाबद्दल भोपाळमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं. ती एका वेब सीरिजच्या कार्यक्रमसाठी इथे गेली होती त्यावेळा माध्यमांशी बोलताना तिने ‘माझ्या ब्राचे साईज देव घेतो’ असे ती म्हणाली. असा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यावर सोशल मीडियावर तिला ट्रॉल करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी मध्यप्रदेशचे गृह मंत्रालय देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी भोपाळ पोलीस आयुक्तांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास अहवाल मागवला आहे. अभिनेत्री श्वेता तिवारीचं वक्तव्य ऐकलं आणि पाहिलं असून हे विधान आक्षेपार्ह असल्याचं गृहमंत्री म्हणाले. तसेच संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश भोपाळ पोलीस आयुक्तांना गृहमंत्र्यांनी दिले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *