जगात जिल्ह्याचा डंका; इटालियन मासिकाच्या टॉप ५ शहारत औरंगाबादला स्थान

औरंगाबाद : अमेरिकेच्या बोस्टन शहराच्या बरोबरीला आता औरंगाबादला जागतिक पातळीवर उत्पादन आणि गंतवणुकीच्या दृष्टीने बघितला जात आहे.’ ग्लि स्टेटी जनरली इनोव्हेझिऑन मॅक्रोइकॉनोमिया’ या इटालियन मासिकाने त्यांच्या यादीत औरंगाबादला टॉप ५ औधोगिक दृष्ट्या विकसनशील शहरात स्थान दिले आहे. त्या मध्ये महाराष्ट्रातील मुंबईचा देखील समावेश आहे. जपान मधील बिजिंग, दक्षिण कोरियातील सेऊल, इटली तील ड्रेस्डेन चा देखील यात समावेश आहे.

इनोव्हेझिऑन मॅक्रोइकॉनोमिया मते शहरात अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूक, प्रकल्प सुरु आहे. हि सर्व प्रकल्प मोठ्या कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जेची आहे, शहरात जागतिक दर्जाचे विद्यापीठ, प्रयोगशाळा, फार्मा कंपनी, टेक्स्टाईल, हॉटेल, टाटा, युनिलिव्हर, रिलायन्स सारखे मोठे उधोग समूह. तसेच बँक आणि आयटी पार्क सारखे मोठ्या दर्जेचे काम सुरु आहे. मुंबई आणि औरंगाबादला या सर्वांचे एक युनिट म्हणून इनोव्हेझिऑन मॅक्रोइकॉनोमिया दर्शवले आहे.

इनोव्हेझिऑन मॅक्रोइकॉनोमिया नुसार ८ लाख लोकसंख्या आणूनही हे शहर उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम काम करत आहे. विध्यार्थी शिक्षण आणि संशोधनासाठी शहरात येतात, व्यवसाय देखील उभारतात यामुळे शहराची आणखीन आर्थिक वाढ होईल असे हि इनोव्हेझिऑन मॅक्रोइकॉनोमिया सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *