महाराष्ट्रराजकारण

नाना पाटोले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, म्हणले ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव…

Share Now

नाशिक : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त विधाने करत आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते,’ असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. नाना पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांनी चांगलेच वादग्रस्त विधान केले. ‘ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते,’ असे विधान त्यांनी केले.

पटोले यांनी काहीच दिवसांपू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणतात, “मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….” असे विधान केले होते. त्यानंतर हे विधान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केले नसून एका गावगुंडाबाबत केल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले होते.

त्यानंतर कथित मोदी नावाचा गावगुंड समोर आला होता आणि त्याने आपल्याला बायको सोडून गेल्याने गावातील लोक मोदी नावाने ओळखत असल्याचे सांगितले होते. इगतपुरी येथे पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झालीय. लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावर टीका केली. त्यामुळे आता नाना पटोले विरुद्ध भाजपा असे चित्र राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *