जिल्ह्यात सिटीबस सेवा पुन्हा सुरु, माजी सैनिक देणार सेवा
औरंगाबाद : २३ जानेवारी २०१९ रोजी औरंगाबादेत स्मार्ट सिटी बस सेवा सुरु केली होती. या बस सेवांना पसंती देखील मिळत गेली. मात्र जवळ जवळ ३ महिन्यात पासून हि सेवा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बंद होती. आता माजी सैनिकांच्या मदतीने बस सेवा सुरु करण्यात अली आहे. स्मार्ट सिटी बसच्या तिसऱ्या वर्दपण दिना निमित्त हि सेवा सुरु करण्यात अली आहे. आता माजी सैनिक हे स्मार्ट सिटी बस चालवणार असून. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी माजी सैनिकांची भरती स्मार्ट सिटी बसमध्ये करण्यात अली आहे.
दरम्यान, मार्ग क्रमांक ४,५,१२,१९ या महत्वाच्या मार्गावरील बस सेवा सुरु आहे. औधोगिक परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्टेन्ड या ठिकाणच्या सेवा तूर्तास सुरु करण्यात आल्या आहे. एकूण ११ बस सध्या या चार मार्गावर धावणार आहे. यामुळे कामगार, प्रवासी यांना प्रवास सोयीचा आणि परवडणारा होईल. खासगी वाहने किमान २० रुपय एवढे भाडे घेतात. तर १० रुपयात सोयीचा प्रवास या बस मुळे मिळणार आहे. अर्बन मोबेलिटी प्रोजेक्ट अवॉर्ड्स या मध्ये औरंगाबाद बस सेवेने पहिला क्रमांक देखील मिळवलेला आहे.