महाराष्ट्र

एमपीएससी’ चा पेपर फुटला..? आयोगाने दिल स्पष्टीकरण

Share Now

राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रश्नसंचाचा सील नियमबाह्य पद्धतीने नागपुरातील एका परीक्षा केंद्रावर फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे. पेपर फुटल्याचा आरोप करत अभिविपच्या कार्यकर्त्यांनी नागपुरात आंदोलन केले. आज सकाळी विद्यार्थी केंद्रावर येण्याआधीच हे पेपेरचे सील फोडल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे.
यानंतर अभिविपच्या कार्यकर्त्यांनी हा सगळा प्रकार पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला आहे. या प्रकरणात आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपाला आयोगाने फेटाळले असून एमपीएससी पेपर फुटीचा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एकुण तीन संचापैकी एक प्रश्नपत्रिकेचा संच हा परीक्षा केंद्र प्रमुख आणि एका लिपिकाने आधीच फोडल्याचा अभिविपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार तिन्ही प्रश्नपत्रिका पेपर सुरू होईपर्यंत शाबहूत होत्या. पोलिसांकडून याबाबतची परिस्थिती शहानिशा करून वास्तविक सत्य अभिविपच्या कार्यकर्त्यांना दाखवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *