क्राईम बिट

मुलीच्या बलात्काराचा बापाने घेतला बदला, कोर्टात आरोपीला गोळी मारून ठार केले

Share Now

उत्तर प्रदेशामधील गोरखपूरमध्ये एका निवृत्त जवानाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ठार मारत बदला घेतला आहे. गोरखपूर न्यायालयाच्या परिसरात मुलीच्या वडिलांनी आरोपी दिलशाद हुसेनवर गोळ्या झाडल्या, यात आरोपी दिलशादचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी न्यायालयाजवळ असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी निवृत्त लष्करी जवानाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बलात्कारातील आरोपी दिलशाद हुसेन हा त्याच्या वकिलाच्या फोनवरून न्यायालयात आला होता. तेथे बलात्कार पीडितेचे वडील भागवत निशाद यांनी दिलशाद हुसेनच्या डोक्यात परवाना असलेल्या पिस्तुलाने गोळी झाडली, त्यात तो जागीच ठार झाला.

मयत आरोपी दिलशाद हुसेन हा गोरखपूरच्या बधलगंज येथील पटनाघाट तिराहा येथे निवृत्त लष्करी जवान भागवत निशाद यांच्या घरासमोर पंक्चरचे दुकान चालवत होता. त्याचे वय २५ वर्ष होते. दिलशानच्या दुकानाच्या शेजारीच निवृत्त लष्करी जवानाच्या घरचे बांधकाम सुरु होते. १२ फेब्रुवारी २०२० रोजी दिलशादने निवृत्त जवानाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते.

त्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी निवृत्त लष्करी जवान भागवत यांनी दिलशानवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १२ मार्च २०२१ रोजी पोलिसांनी दिलशादला हैदराबाद येथून अटक केली आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली. दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटलेल्या आरोपी दिलशादची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती.

पोलीस अधीक्षक विपिन टाडा यांनी सांगितले की, न्यायालयाच्या परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून हल्लेखोराला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *