औरंगाबाद शहरातील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनानेने घेतला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
औरंगाबाद मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडे यांनी मात्र सध्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवणार असून पुढील परिस्थिती चा आढावा घेऊन निर्णय घेणार आहे.