मोठी बातमी । आता लस मेडिकलवर विकत मिळणार ?
दिल्ली : DCGI च्या सब्जेक्ट एक्स्पर्ट कमिटीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीन लस आता खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. माहितीनुसार ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाच्या (DCGI) तज्ज्ञांच्या समितीनं कोव्हॅक्सीन आणि कोविशील्डच्या मार्केटिंग अप्रूव्हलसाठी अर्जांची पडताळणी केली होती. त्यानंतर आता समितीनं कोविशील्ड आणि कोव्हॅक्सीनला खुल्या बाजारात विक्रीसाठी शिफारस केल्याची माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारच्या कोविन पोर्टलवर नोंदणी असलेल्या रुग्णालये अथवा क्लिनिकशी संबंधित मेडिकल दुकानांवरच या दोन्ही लसींची विक्री करता येईल.
दरम्यान, या विषयावर अनेकांचे दुमत देखील आहे. बाजारात विक्री मुळे लसींचा तुटवडा देखील होऊ शकत. त्यामुळे काळाबाजार आणि बोगस लसींचे पुन्हा येऊ शकते. तसेच आणखीन भारतात पूर्णपणे लसीकरण होत नाही तो पर्यंत बाजारात लास विक्रीला काढू नाही असे मत बहुतांश लोकांचे आहे. तसेच दुसरीकडे देशाला याचा आर्थिक फायदा होईल यावर देखील काही जण म्हणतात बाजारात विक्री करणे फायद्याचे ठरेल.