कर्जतमध्ये रोहित पवारांची एकहाती सत्ता, कॉग्रेसने दिली साथ

कर्जत : राज्यात १०६ नगरपंचायत तर २ झेडपी निवडणुकींनाचॆ निकाल जाहीर झाला आहे. राज्यात १०६ नगरपंचायती मध्ये एकूण १८०२ जागा आहेत. कर्जत येथे राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळावला आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वा खाली हा विजय मिळवण्यात आला आहे. १७ पैकी १२ राष्ट्रवादी तर ३ काँग्रेस असे १५ जागा त्यांनी मिळवल्या आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी आणि कॉग्रेस एकत्र येऊन हि निवडणूक लढले होते. आणि दणदणीत विजय या ठिकानी त्यांना मिळाला आहे. या बद्दलची माहिती देताना रोहित पवार यांनी एक ट्विट केले असून, त्यात त्यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान, राज्यात १०६ नगरपंचायत तर २ झेडपी निवडणुकींनाचॆ निकाल लागणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष उत्सुक आहे. भंडारा आणि गोदीया या ज़िल्हा परिषदेचे देखील आज निकाल आहे. दरम्यान चुरसेची लढलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोंदिया जिल्यात एकूण जिल्हा परिषदेच्या ५३ जागा आहे तर भंडारा जिल्यात ५२ जागा आहे. राज्यात १०६ नगरपंचायती मध्ये एकूण १८०२ जागा आहेत. यावेळी राष्ट्रवादी हा या निवडणुकीत अग्रस्थानी दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *