कोरोना पॉझिटिव्ह आमदार आंदोलनात कसे? कॉग्रेसचा सवाल
नागपूर : आमदार कृष्णा खोपडे यांनी पाच दिवसापूर्वी सोशल मीडियावर कोरोना पॉसिटीव्ह असल्याची माहिती दिली होती.तरी ते आंदोलनात कसे असे प्रश्न कॉग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्तित करत जोरदार टीका केली, लोंढे म्हणले “त्याची उपचार अवधी ७दिवसांची होती. तुमच्या दृष्टिकोनातून विषय महत्वाचा वाटत असेल, तर आंदोलन करावे. पण अशा पद्धतीने सुपर स्प्रेडर बनने हे चुकीचे आहे. माझी नागपूर पोलिसांना विनंती आहे कि, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा.” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान यावर आमदार कृष्णा खोपडे यांनी देखील स्पष्टीकरण दिले, “मी 12 जानेवारी ला पॉसिटीव्ह आलो. त्यानंतर पाच दिवस आपल्या घरी होतो. महापालिकेलच्या अधिकाऱ्यांना विचारलं मला सुरुवातीपासून कोणत्या ही प्रकारची लक्षणे नव्हती. सर्दी, खोकला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाही तर मी बाहेर निघू शकतो का? आरोग्य अधिकारी म्हणाले, पॉसिटीव्ह असल्या पासून तीन दिवस कोणतीही लक्षणे नसतील, तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्यामुळे मी आजच्या कार्यक्रमाला गेलो, असे खोपडे म्हणाले.