देश

INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट तीन जवान शहीद

Share Now

आज मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाला. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. मोठी भौतिक हानी झाल्याचे माहिती नसली तरी तीन नौदल जवान यामध्ये शहीद झाले आहेत. नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज INS रणवीरच्या अंतर्गत कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे.

या दुर्दैवी घटनेत दहा जवान जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवानांवर कोलाबा नेवी नगर येथील INHS अश्विनी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा तपास करण्यासाठी बोर्ड ऑफ इंक्वायरीचे आदेश दिले आहेत.

INS रणवीर युद्धनौका गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनवर तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. या युद्धनौकेवर नेमका कोणत्या कारणाने झाला असावा याच कारण स्पष्ट झालेले नाही, या घटनेचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *