मनोरंजन

धनुष ऐश्वर्याचा १८ वर्ष सहवास आता घटस्फोट घेण्याचा निर्णय

Share Now

फिल्म इंडस्ट्रीतील आणखी एका कपलने घटस्फोटाची घोषणा केली आहे.साऊथचा सुपरस्टार धनुषने सोमवारी रात्री उशिरा पत्नी ऐश्वर्यापासून घटस्फोट घेतल्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

धनुषणे घटस्फोट केल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. “आमचा १८ वर्षांच्या सहवास होता, आतापर्यंत खूप चांगला प्रवास राहिला, कुटुंबीयांचा आशीर्वाद होता. पण आम्ही आता वेगळं होण्याचा निर्णय घेत आहोत. त्यामुळे आमच्या या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा’, असं सांगत धनुष यांने घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष या दोघांच लग्न १८ नोव्हेंबर २००४ मध्ये झाले. त्यांच्या लग्नाची खूप चर्चा रंगली होती. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आई-वडील आहेत, याथरा आणि लिंगा अशी या मुलांची नाव आहेत. धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू आहे.

https://twitter.com/dhanushkraja/status/1483128992312225792?t=ujMYfrRq7UFQnZ6Um6pjqw&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *