हर्सूल कारागृहात दोन कैद्यांचा मृत्यू, काय आहे कारण ?
औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील कोठेवाडी दरोडा प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांचे हर्सूल कारागृहात मृत्यू झाला आहे. काळ (दि १६ जानेवारी) सकाळी ७ वाजता हृदयविकाराने एका कैद्याचा तर आज उपचार घेताना एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर येत आहे. हब्या पानमळ्या भोसले (५५, कैदी क्रमांक सी ६५४४) व रमेश नागोराम चक्रउपे ( ६०, कैदी प्रम सी – ८७५२ )असे मुत्यू झालेल्या दोन कैद्यांचे नाव आहे. यातील हब्या याचा सकाळी ७ वाजता तर रमेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.
१७ जानेवारी २००१ साली अहमदनगर येथील कोठेवाडी एकूण १३ दरोडेखोरांनी दरोडा घातला व चार महिलांवर बलात्कार केले. यावर मोक्का अंतर्गत त्यांना शिक्षा सुनावण्यातअली होती. त्यावेळी त्यांनी त्या वस्तीवरून तब्बल ४४ हजारा पेक्षा अधीक रुपयाचे दागिने बळकावले. तसेच संपूर्ण वस्तीला मारहाण देखील केली. हे प्रकरण महाराष्ट्रात फार गाजले होते.
दरम्यान, या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पहिले होते. गंगापूर, वैजापूर आणि नगर सह अनेक भागात त्यांनी दरोडा, मारहाण, लूटमार, बलात्कार इत्यादी गुन्हे देखील पोलिसांनी निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणात १३ आरोपींना १२ वर्ष सक्त मजुरी आणि १० लाख प्रत्येकी दंड लावण्यात आला होता. तसेच एकूण एक कोटी तीस लाख रुपयाचा दंड यावेळी मोक्का न्यायालयाने यांच्यावर लावला होता.