‘फटे स्कॅम’ बद्दल स्वतः विशाल फटेने दिल स्पष्टीकरण, पहा व्हिडीओ
सोलापूर : सध्या हर्षद मेहता सारखा एक स्कॅम सोलापुरातील बार्शी (Barshi fate scam)तालुक्यात झाला आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विशाल फटे याने २०० कोटींचा घोटाळा (200 cr sacm vsiahl fate)करून फरार झाला आहे. या आर्थिक फसवणुकी प्रकरणी विशाल फटे विरोधात अनेक लोकांनी फिर्याद दिली आहे. यावर स्वतः विशाल फटे याने सोशल मीडियावर २७ मिनिटाचा व्हिडीओ शेअर करत त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडीओ मध्ये त्याने सांगितले कि , “लोकांना फसवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे अडकले. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायला तयार आहे. आज मी पोलिसात हजर होणार, तसेच अनेकांनी चर्चा केली की २०० कोटींचा घोटाळा आहे. मात्र जास्तीत जास्त १० कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत, मी इज्जतीला घाबरुन सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. अंबारेनं माझ्याविरोधात केस केली. त्यानं मला विचारायला हवं होतं. त्याच्याकडं जमीन गाड्या, सोनं झालं ते कस झालं. ते त्यांना विचार.” असे तो म्हणाला.
विशाल फटे चा संपूर्ण व्हिडिओ पहा
मी सगळा डेटा लोकांना दिला .तसेच मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत. दोन दिवसात मी गोष्टी मॅनेज केल्या असत्या पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्या लोकांकडून पैसे येणं अपेक्षित होतं ते आले नाहीत. असं स्पष्टीकरण विशालने दिल आहे.