पंजाब निवडणूक १४ एवजी २० फेब्रुवारी रोजी होणार, नेमके काय आहे कारण…
पंजाब : सध्या देशात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर सह पंजाब या राज्यांच्या विधानसभा (assembly election 2022) निवडणूका आहे. तसेच निवणूक आयोगाने पंजाब(Panjab election2022) निवडणुकीची तारीख १४ फेब्रुवारी दिली होती . यावर पंजाबचे मुख्यमंत्री चंद्रजीत सिहं चुन्नी आणि भाजपने सुद्धा निवडणूक आयोगाला पत्र लिहून तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
त्यांनी पत्रात कारण दिले की, १६ तारखेला गुरु रविदास यांची जयंती असते त्यावेळा त्यांचे अनुयायी १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी पर्यंत वाराणसीला जातात. त्यामुळे त्यांना मतदान करणे शक्य होणार नाही. म्ह्णून तारीख बदलून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षाने देखील केली होती. यावर आज सकाळी निवडणूक आयोगाच्या बैठकीत पूर्ण ११७ जागेच्या निवणूका २० फेब्रुवारी रोजी होईल असा निर्णय घेयात आला.
दरम्यान, या निर्णय मुळे अनेक संघटनांनी आनंद व्यक्त केला. पंजाबमध्ये जवळ जवळ २०-२५ टक्के जनता संत रविदास यांची अनुयायी आहे. यामुळे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात एकूण मतदान कमी होऊ शकते असे अनेकांचे मत होते.thereporternews