newsमहाराष्ट्र

शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन.डी.पाटील यांच निधन

Share Now

कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचे नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील (वय ९३) यांचे आज निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे अकरा जानेवारीपासून येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर बनली. आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉ.अशोक भूपाळी यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षी वयाच्या ९३ व्या वर्षाही त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशा भावना सर्वच स्तरातून उमटल्या. त्यांनी आता पर्यंत भाई माधवराव बागल पुरस्कार – १९९४ ,स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, १९९९, राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – १९९८ – २०००, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, २०००, विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- २००१, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर -डी.लीट.पदवी, शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना सम्मानित केले गेले होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *