देश

पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं निधन

Share Now

प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने  निधन झाले,  ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी दिली आहे.

लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

https://twitter.com/ANI/status/1482904493465677825?t=Si4MtXPsT317x8XsVLGvXg&s=19[lock][/lock]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *