news

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या आणखीन एका विद्यार्थ्यांची आत्महत्या

Share Now

पुणे : मागील वर्षी पुण्यात स्वप्नील लोणकर या MPSC च्या उमेदवाराने आत्महत्या केली होती. त्याच प्रकारे पुण्यात अजून एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात राहून PSI होण्याची स्वप्न ऊराशी बलगून अथक परिश्रम घेणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील सदाशिव पेठेत घडली आहे. अमर मोहिते असं या विद्यार्थ्यांच नाव आहे. MPSC च्या विद्यार्थ्यांनी अचानक आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अमर मोहिते हा मूळचा सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता. तो पुण्यात राहून राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची तयारी करत होता. दुर्दैवं म्हणजे मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या फिजिकलमधून बाहेर पडला होता, तेव्हापासून अमर नैराश्यात होता अशी माहिती समोर आली आहे. या नैराश्यातूनच त्यानं हे धक्कादायक पाऊल उचलल्याची माहिती समोर येतेय.

दीड वर्षांपासून कोरोनामुळे MPSC च्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यात परीक्षा रद्द होणे, पुढे ढकलणे आणि नियुक्ती न मिळेल यावरून अनेक विद्यार्थी नैराश्यात आहेत. यातच मागील वर्षी स्वप्नील लोणकर या MPSC च्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं करण्यात आली होती. MPSC च्या विद्यार्थ्यांचा मुद्दा चांगलाच तापला होता.

नंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं अनेक होतकरू विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. मराठाआरक्षण अचानक रद्द झालं आणि अनेक विद्यार्थ्यांना भरतीला मुकावं लागलं होतं. अमर मोहिते या विद्यार्थ्यांचंही सिलेक्शन झालं होतं. मात्र मराठी आरक्षण रद्द झालं आणि अमरला फीझीकलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यामुळे त्यानं हे पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *