वर्धा अवैध गर्भपात ; आणखी नवे पुरावे
वर्धा येथील कदम रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे, यामुळे शोधकार्य अतिशय कसोशीने सुरु झाले, आधी अकरा कवट्या सापडल्या असताना पुन्हा त्यात भर पडली असून एक कवटीसारखा अवयव आढळला असल्याची माहिती आहे. यामुळे आता या परिसरातून १२ कवट्या आणि ५४ हाडं आढळली आहे. फॉरेन्सिक टीमने हे शोधकार्य सुरु ठेवले आहे.
पोलिसांनी आधी रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या गॅस चेंबरची तपासणी केली होती. त्यात ११ कवट्या ५४ हाडं, वापरलेले ग्लोज, सीरींज, प्लास्टिक पिशव्या इत्यादी तसेच पिशवीमध्ये अभ्रकांचे अवयव आढळून आले, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाचा सखोल अभ्यास करत तपासासाठी वेगळे पथक स्थापन केले. या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास आणखी कोणती दिशा घेतो हे बघणे महत्त्वाचे आहे.