योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ ठरला, ‘इथून’ लढणार निवडणूक

अयोध्या : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय क्षेत्रात मोठी हालचा पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ अयोध्येतूून विधानसभा लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये योगी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न होता. आधी योगी मथुरेतून लढतील अशा चर्चाही झाल्या. पण, आता त्यांच्या मतदारसंघावर शिक्कामोर्तब झालंय.

तसेच .स्वामी प्रसाद मौर्य, भगवती सागर, रोशनलाल वर्मा, विनय शाक्य, अवतार सिंह भाड़ाना, दारा सिंह चौहान, बृजेश प्रजापति, मुकेश वर्मा, राकेश राठौर, जय चौबे, माधुरी वर्मा, आर के शर्मा, बाला अवस्थी, धर्म सिंह सैनी अशा भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला निरोप दिला आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील शिवसेना ५० जागेवर लढणार आहे अशी घोषणा केली. अशातच देशभराचे लक्ष या ७ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *