शहरातील नामांकीत राज क्लॉथ स्टोअर्स सील; व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
औरंगाबाद : शहरातील आकाशवाणी चौकातील नामांकित राज क्लॉथ स्टोअर महानगरपालिकेकडून सील करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.हि कारवाई जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या भरारी पथकाने केली आहे. दरम्यान कारवाई दुपारी २ ते ३ च्या सुमारास घडली
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दुकानातील काही कर्मचाऱ्याने मास्क लावलेला नव्हता, तर चार कर्मचार्यांचा लसीचा पहीला डोस पूर्ण झालेला नव्हता. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या क्लॉथ स्टोअरमध्ये तब्बल १५० कर्मचारी कामाला आहेत. पुढील आदेशापर्यंत हे क्लॉथ स्टोअर बंद राहणार आहे. अशी माहिती पथकाने दिली. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे.