स्कुल बससाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, एक वर्षाचा वाहतूक कर पूर्णपणे माफ
मुंबई : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा तसेच महाविद्यालय बंद आहे. तसेच शालेय विध्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कुल बस देखील बंदच आहे. अशात राज्य सरकारने या स्कुल बससाठी मोठा निर्णय घेतला आहे. या वर्षी वाहतूक करा पासून स्कुल बसला सुटका मिळणार आहे. असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे.
Maharashtra cabinet: In view of COVID, all school buses will get 100% exemption from annual vehicle tax this year. Marathi signboards will be mandatory for all establishments including establishments having less than 10 workers.
— ANI (@ANI) January 12, 2022
४० सीटर बससाठी प्रति सीट १०० रुपय प्रति वर्ष असे ४० सीटांच्या बससाठी प्रति वर्ष ४००० रुपय एवढा कर आकारला जातो. १ एप्रिल २०२० ते ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतचा कर राज्य सरकारने पूर्णतः माफ करण्यात आलेला आहे. एकूण ८.५० कोटींचा कर राज्य सरकारने माफ केलेला आहे. बसू चालकांची आर्थिक अडचण ओळखू हा निर्णय सरकाने घेतला आहे असे सांगण्यात येत आहे .
दरम्यान, कोरोनामुळे निर्बंध कडक झाले आहे. अशात माध्यम वर्गीयांच्या आर्थिक अडचणी हि वाढत आहे. यावर तोडगा म्हणून स्कुल बस चालकांसाठी घेतलेला हा निर्णय योग्य आहे.