चार महिन्याच्या मुलीचे अपहरण करून विकले आणि आई देखील बेपत्ता
मुंबई : ४ महिन्याच्या चिमुकलीला ४ लाख ८० हजारात एका सिव्हिल इंजिनिअरला तामिळनाडू येथे विकल्याच्या संशययवरून ११ जणांना अटक करण्यात अली आहे. मुंबई पोलिसांच्या दोन पथकांनी या चिमुकलींची सुटला तामिळनाडूच्या कोयंबतूर येथून केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.
सर्व प्रथम इब्राहिम अल्ताफ शेख (३२) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. तसेच त्याच्या कडून मिळालेल्या माहिती नंतर सायन, धारावी, मालाड जोगेश्वरी, नागपाडा आणि कल्याण, ठाणे येथे छापे टाकले. त्या नंतर २ महिला आणि ४ पुरुषांना या छापेमारीतून अटक करण्यात आली. अटक केलेल्या सर्वानी या गुन्ह्याची कबुली देत सांगितले की, ४ लाख ८० हजारात बाळाला सेल्वनपट्टी येथे राहणाऱ्या सिव्हिल इंजिनिअर आनंद कुमार नागराजन याला विकण्यात आले होते. तसेच तपासात असे लक्षात आले कि आरोपी इब्राहिम अल्ताफ शेख हा मुलीच्या आई बरोबर लिव्हइनमध्ये राहत होता. इब्राहिमचा दावा आहे कि तोच त्या मुलाचा वडील आहे. दरम्यान त्याच्या या दाव्याची पूर्तता करण्यासाठी मुंबई पोलीस त्यांची डीएनए चाचणी करणार आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.
यावर अधिक मिळालेली माहिती अशी की, १ जानेवारी रोजी त्या चिमुकलीची आई काही कामासाठी बाहेर जाते म्हणून गेली ती पुन्हा आलीच नाही. पोलीस आता त्या मुलीच्या आईचा देखील शोधात आहे.