रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

कोरोनाची प्रादुर्भाव संपूर्ण देशात वाढत आहे, मागील आग दिवसात केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्री रावसाहेब दानवे, आरोग्यमंत्री भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली.
आज रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी याना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

“मी आज सौम्य लक्षणांसह कोरोनाची चाचणी केली आहे.मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करून मी स्वतःला वेगळे केले आहे आणि मी होम क्वारंटाईनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वत:ला वेगळे राहावे आणि चाचणी करून घ्यावी.”

https://twitter.com/nitin_gadkari/status/1480951812475613185?t=BuzbibnVzTvwjrVB9n30vw&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *