या राज्यात हॉटेल आणि बार बंद
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात वाढत आहे, यामुळे कोरोना रुग्णाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, भारतातील कोरोना रुग्णाची संख्या काल १ लाख ८० हजारपर्यंत गेली, दिल्ली मध्ये देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे दिल्लीत खासगी कार्यालये बंद करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या वाढत्या रुग्ण संख्येला रोखण्यासाठी नागरिकांची गर्दी टाळणे गरजेचे आहे, दिल्ली प्रशासनाने दिल्लीतील सर्व बार आणि हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. हॉटेलमध्ये केवळ होम डिलिव्हरी देण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यापूर्वी दिल्लीत विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे, कोरोना रुग्णाची वाढणारी रुग्ग्णसंख्या चिंताजनक असल्याने हा निर्णय घेण्यात आला.