आजपासून बूस्टर डोस मिळणार, बूस्टर डोस कधी आणि कुणासाठी आहे
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. यामुळें वर्ष अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाईन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बूस्टर लस देण्याची घोषणा केली होती. आज पासून १० जानेवारी पासून त्याला सुरवात होणार आहे.
आजपासून सर्व शासकीय , महापालिका तसेच खासगी लसीकरण केंद्रावर फ्रंटलाईन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बूस्टर लस मिळणार आहे. तसेच बूस्टर डोसची नोंदणी तुम्ही ऑनलाइन किंवा लसीकरणाच्या केंद्रावर देखील करू शकणार आहेत.
फ्रंटलाईन कर्मचारी, आरोग्य कर्मचारी तसेच ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना बूस्टर लससाठी त्यांनी दुसरी लस घेतलेल्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाल्यास ते १० जानेवारीपासून बूस्टर लस घेण्यास पात्र असणार आहे.
६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लस घेण्यासाठी केंद्रावर कुठलेही प्रमाणपत्र देण्याची गरक नसली तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस देण्याचे निकष आहेत.