कोरोना अपडेट

राज्य सरकारची २४ तासात नवी नियमावली जाहीर

Share Now

राज्य सरकारने कोरोनाची वाढती रुग्ण संख्या बघता राज्यात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे, शनिवारी रात्री नियमावली नवीन नियमावलीय जाहीर करण्यात आली त्यात पुन्हा बदल करण्यात आला.
काल जाहीर झालेल्या नियमावलीत सलून केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, तसेच ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.

नव्या सुधारित आदेशानुसार १० जानेवारीपासून राज्यात सलून आणि ब्युटी पार्लर त्याचबरोबर जीम देखील सशर्त सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *