देशाच्या रक्षणासाठी बर्फाच्या वादळात उभा आहे जवान, या जवानाला सलाम

देशात आपण आज सुरक्षित का आहोत ?  या प्रश्नाला एकच उत्तर आहे. सीमेवर उभे असलेले जवान, स्वतःच्या जीवाची बाजी लावत, देशाच्या संरक्षणसाठी सीमेवर उभे आहेत. पायाला ठेच लागताच आपण  चार आईची आठवण काढत असतो, परंतु ऊन, वारा पाऊस येईल त्या नैसर्गिक संकटसमोर देखील खंबीरपणे आपल्या देशाच्या रक्षणासाठी उभे आहेत भारतीय सैनिक, कालच एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक जवान अंगावर बर्फ झेलत आपलं कर्तव्य बजावत आहे.

भारतीय जवान कर्तव्य बजावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जवान गुडघाभर बर्फात देखील उभे आहेत.

हा समोर आलेला जवानांचा व्हिडिओ संरक्षण मंत्रालयाच्या उधमपूर जनसंपर्क अधिकाऱ्यानं त्यांच्या अधिकृत हँडलवरून हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओ ट्विट करताना त्यांनी लिहिलंय, आपण आपल्या ध्येयापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाही, मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि त्यागानं ते गाठू शकतो. प्रत्येकाला जगण्यासाठी एकच आयुष्य आहे, पण देशाचा प्रश्न आला तर कोण पाठीशी उभं आहे?

https://twitter.com/proudhampur/status/1479505350323675136?t=4m9XDQ2ykowMdA0Gmi1kqA&s=19

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *