मुंबईत “मिनी लॉकडाऊन” लागण्याची शक्यता महापौर किशोरी पेडणेकर याच सूचक वक्तव्य
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक होत आहे, मुंबई शहरातील मागील चोवीस तासात कोरोनाची रुग्ण संख्या वीस हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे मिनी लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. असं वक्तव्य महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. सध्यातरी पूर्णपणे लॉकडाउन लावण्याचा विचार नाही, पण नागरिकांनी काळजी घ्यावी घाबरून न जाता नियमच पालन करावा.
मुंबईत कोविड सेंटरमध्ये पुरेसे बेड उपलब्ध आहेत, गंभीर रुग्णांसाठी २२ हजार बेड्स राखीव ठेवले आहेत. परंतु सध्या बाधित रुग्णांमध्ये गंभीर लक्षणं दिसत नाहीत. सध्या रुग्णालायत १ हजार १७० रुग्ण दाखल आहेत, पूर्णपणे लॉकडाऊन सध्या तरी होणार नाही, परंतु काही नागरिकांनी बेफिकिरपणा दाखवला तर रुग्ण संख्या वाढत राहिल. काही कठोर पावलं उचलली जाऊ शकतील असं महापौरांनी स्पष्ट केलं आहे.
आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री आणि शरत पवार याबाबतचा निर्णय घेतील. मुंबईतील निर्बंधाबाबत आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत निर्णय जाहीर होऊ शकतो असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मिनी लॉकडाऊन लावणं परवडणार आहे, असं महापौर पेडणेकर यांनी सांगितले.