देश

ओबीसी आरक्षणाला वैद्यकीय कोट्यात मंजूर

Share Now

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला असून वैद्यकीय अभ्यासक्रमात लागू करण्यात आलेल्या ओबीसींच्या २७ टक्के आरक्षण आणि ईडब्ल्यूएसच्या १० टक्के आरक्षणाच्या आधारे प्रवेशप्रक्रिया राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळं नीट पीजी समुपदेशन प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एएस बोपण्णा यांच्या बेंचनं हा निर्णय दिला.

सुप्रीम कोर्टानं २७ टक्के ओबीसी आरक्षणासंदर्भातील घटनात्मक वैधता मान्य केली. तर, ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात चालू वर्षीची प्रवेश प्रक्रिया सध्याच्या नियमानं पार पाडण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया आणखी उशिरा होऊ नये म्हणून कोर्टाकडून ही दक्षता घेण्यात आली. ईडब्लूएस आरक्षणाच्या निकषासंदर्भातील अंतिम निर्णय हा याचिकेच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल, असं देखील स्पष्ट केलं आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *