निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, निवडणुक खर्च मर्यादा वाढवली
या वर्षांत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोग कुठल्याही क्षणी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे, त्याचसोबतच भारतीय निवडणूक विभागाने मोठा आज मोठा निर्णय दिला आहे.
विधानसभा सभा आणि लोकसभा निवडणुकीत निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. लोकसभा मतदारसंघात आधी ७० लाख रुपये खर्चाची मर्यादा होती ती वाढवून आता ९५ लाख रुपये रुपय करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीत देखील पूर्वी विधानसभा मतदारसंघात २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा आता ४० लाख रुपये करण्यात आली आहे.
भारतीय निवडणूक आयोग संसदीय आणि विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी विद्यमान निवडणूक खर्च मर्यादा वाढवली असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये या मर्यादा लागू होतील.
https://twitter.com/ANI/status/1479106861764800518?t=sI9L_Zl_hWdubyp-d6UMZQ&s=19[lock][/lock]