क्राईम बिट

औरंगाबादेत बाईकवर किस करणाऱ्या मजनूने मागितली माफी, असे न करण्याचं केलं आवाहन

Share Now

सोशल मीडियावर दोन दिवसापासून एका प्रेम युगलांचा अश्लील चाळे करणारा व्हिडिओ व्हायरल झाला . हा तरुण त्याच्या प्रेयसीसोबत औरंगाबाद शहरातील मुख्य रस्त्यावर धावत्या दुचाकीवर अश्लील चाळे करत होता , त्यांचा व्हिडिओ एका कार चालकाने शूट करून व्हायरल देखील केला. या तरुणावर पोलिसांनी कारवाई केली असून तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
शहरातील बीड बायपास परिसरात राहणार हा तरुण सुरज गौतम कांबळे असून ३१ डिसेंबरच्या रात्री मित्रांसोबत पैज लावली होती. त्याने देखील पैज स्वीकारून प्रेयसीला बोलावले. आणि आकाशवाणी ते सेवन हिल या रोडवर त्यांनी असे अश्लील कृत्य केले.

या प्रकरणाची चौकशी करून पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरक्षक अनंता तांगडे तसेच कर्मचाऱ्यांनी तपास करून या तरुणाला ताब्यात घेतले आणि पो. कॉ . संतोष बमनावत यांनी तरुणाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
या तरुणाने देखील मागितली असे कृत्य न करण्याचे आवाहन देखील केले आहे. असं कृत्य कुणीही करू नका मी जो स्टंट केला त्यामुळे माझ्या देखील जीवाला धोका होता, आणि समोरच्या देखील जीवाला धोका होता. परंतु माझ्याकडून चूक झाली तुम्ही अशी चूक करू नका असे या तरुणाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *