आजपासून औरंगाबाद जिल्ह्यात नवे कडक निर्बंध लागु
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यात कडक निर्बंध लावणे आवश्यक असून. जिल्ह्यात निर्बंध कडक करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा टास्क फोर्स आणि शहरातील खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
– रुग्णांना गृह विलगीकरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक
– हुर्डापार्टी/फॉर्म हाऊसवर पूर्णपणे बंदी: उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई.
– मंगल कार्यालयातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मंगल कार्यालय व्यवस्थापणाची.
– लसीकरण केलेले नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. तसेच त्यांनी मास्क परिधान केलेले असावे.
– शासकीय/निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द.
– शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनी मंगल कार्यालयांना नियमित भेटी देण्याचे निर्देश
या बैठकीत मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, पोलिस अधिक्षक निमितकुमार गोयल, उपायुक्त डॉ. उज्वला वनकर, वैद्यकीय अधिकारी पारस मंडलेचा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी तसेच खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.