राज्यात लॉकडाऊन नाही पण क्वारंटाईनच्या नियमात बदल
वाढती कोरोना आणि ओमीक्रोनची रुग्ण संख्या आटोक्यात आन्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळाची उपमुख्यमंत्री अजित पवार(ajitpawar) यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात सध्या तरी लॉकडाऊन (lockdown) लावण्याची गरज नाही, परंतु ज्या भागात रुग्ण वाढतील त्याभागात अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा चालू ठेवण्यास वेळेचे बंधन घालून चालू ठेवण्याचा विचार आहे. नागरिकांची गर्दी होणार नाही याची काळजी घेणे सध्या गरजेचे, असे राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच
तसेच कोरोना रुग्णाचा क्वारंटाइनचा कालावधी ७ दिवसांचा असणार आहे. आता RTPCR नाही तर अँटिजनवर जास्त भर द्यावा लागणार आहे. क्वारंटाइन असताना लोकांनी नियम पाळणं बंधनकारक आहे.
अँटिजन टेस्ट केली तर RCPCR टेस्ट करण्याची गरज नाही. ९० टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणं नाहीत. मात्र नागरिकांनी गर्दी टाळायला हवी. असं आवाहन राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे.
पुढील १५ दिवसांत परिस्थिती बघून त्यावर पुढचे निर्णय घेण्यात येतील. तूर्तास लॉकडाऊनचा विचार नाही. मात्र निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. मागील ३ दिवसांत राज्यात दुप्पट रुग्णसंख्या होत आहे. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
राज्यातील रुग्ण संख्या आज २५ हजार पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या रुग्ण संख्येचा दर बघता दीड पट रुग्ण संख्या वाढत असल्याचे देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.