जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

अनाथांची माय’ म्हणून ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.
पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.
सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सिंधुताई सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *