पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक एनसीपीकडे तरी दादांना धक्का !
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं पुन्हा यश मिळवलं आहे. एकूण २१ जागांवर निवडणूक असताना १४ आधीच बिनविरोध होते.
त्यात राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे २ व भाजपच्या एका संचालकाचा समावेश आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा वरचष्मा असला तरी बारामतीत अजितदादांना धक्का बसला आहे. सुरेश घुले यांच्या पराभवामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार हा यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विकास दांगट यांनी विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचेच ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के यांचा पराभव केला आहे.
अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, संग्राम थोपटे, संजय जगताप, दिलीप मोहिते, रमेश थोरात, संजय काळे, आप्पासाहेब जगदाळे, माऊली दाभाडे, रेवनाथ दारवटकर, प्रविण शिंदे, संभाजी होळकर, दत्तात्रेय येळे हे उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यामुळं ही बँक पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार हे आधीच स्पष्ट झाले होते.
उर्वरित सात जागांवर झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यापैकी तीन जागांवर सुनील चांदेरे, अशोक पवार व विकास दांगट हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळं बँकेच्या संचालक मंडळात राष्ट्रवादीची संख्या १४ झाली आहे. तर, उर्वरित सात जणांमध्ये इतर पक्षांचे सदस्य आहेत.