कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
दररोज वाढणारी रुग्ण संख्या बघता महाराष्ट्र तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मुंबई शहरातील पॉझेटिव्हिटी रेट वाढत असून आज मुंबई शहरात १०८६० रुग्ण आढळून आले आहेत, कालपेक्षा आज दोन हजार रुग्ण जास्त आढळून आले.
त्यात चिंता वाढवणारी बाब म्हणजे आज कॉर्डेलिया क्रूझवरील ६६ प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यापैकी ६ लोक गोव्यात उतरले होते, उर्वरित ६० लोक आज मुंबईत परतले आहेत. जहाजावरील सर्व प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल, उद्या सकाळी ७ वाजेपर्यंत त्यांचे निकाल जाहीर होतील. अशी माहिती बीएमसीच्या वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंब्रेकर यांनी दिली आहे.
Mumbai | 66 passengers onboard Cordelia cruise tested positive. Of these,6 ppl disembarked in Goa,rest 60 ppl have returned to Mumbai today. All passengers onboard the ship will undergo RT-PCR test, their results will be out by 7am tomorrow: Prajakta Ambrekar, Medical officer,BMC pic.twitter.com/yhnNy8bQDV
— ANI (@ANI) January 4, 2022
Mumbai reports 10,860 fresh infections of COVID19 & 2 deaths; Active cases 47,476 pic.twitter.com/WGfQpt2KaE
— ANI (@ANI) January 4, 2022