या जिल्ह्यात पहिली शाखा स्थापन करणाऱ्या शिवसैनिकांची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या
नेता कायम तुपाशी मात्र कार्यकर्ता अजूनही उपाशी या वाक्याप्रमाणे एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यात घडली आहे. एक सच्चा शिवसैनिक ज्याने उस्मानाबादमध्ये पक्षाची पहिली शाखा स्थापन केली. या शिवसैनिकाने आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
या शिवसैनिकांच नाव आहे दत्तात्रय नारायण वऱ्हाडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली शाखा स्थापन करणारा आणि शिवसेना पक्षाचा सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख कायम राहील.
दत्तात्रय नारायण वऱ्हाडे यानी चहाच्या व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत, निवडणुकीत निस्वार्थीपणे घरोघरी जाऊन प्रचार देखील त्यांनी केला आहे. फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे याना दैवत मानणाऱ्या आणि पक्षाबद्दल असलेलं प्रेम तसेच आदर त्यांनी उराशी बागळुन पक्षाचं निस्वार्थीपणे काम केल्याचं सांगितलं जातं आहे.
१९८४ साली दत्तात्रय नारायण वऱ्हाडे यांनी जिल्ह्यातील पहिली शिवसेनेची शाखा उस्मानाबाद शहरात स्थापन केली होती. ही शाखा स्थापन करताना यांच्याकडे पैसे देखील नव्हते. त्यांनी उधार पैसे घेऊन सेनेची शाखा स्थापने केली होती.
गेल्या काही दिवसाचा आपण आढावा घेतला तर असे सच्चे कार्यकर्ते कमी प्रमाणात दिसून येतात, कारण स्वार्थासाठी पक्ष बदलणारे भरपूर कार्यकर्ते मिळतील कुठलाही स्वार्थ न बाळगता काम करणारे कार्यकर्ते मात्र अपवादात्मक मिळतील. पक्ष कुठलाही असो परंतु अश्या कार्यकर्त्यांच्या कामाची पक्षाने दखल घ्यायला हवी.