दिल्लीचे मुख्यमंत्री कोरोना बाधित, दिल्लीत रेड अलर्ट..?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे, अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटरवर आज सकाळी अशी माहिती दिली.
“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सौम्य लक्षणे असल्याने. स्वत:ला घरी एकटे ठेवले आहे. गेल्या काही दिवसांत जे माझ्या संपर्कात आले, त्यांनी कृपया स्वतःला वेगळे ठेवा आणि स्वतःची चाचणी घ्या. असे आवाहन देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.
दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासात दिल्लीत कोरोनाचे ४०९९नवे रुग्ण आढळले होते. पॉझिटिव्हिटी रेट ६.४६ टक्के इतका झाला आहे.
दिल्लीत काही दिवसांपूर्वीच यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, सलग दोन दिवस पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा जास्त राहिला तर रेड अलर्ट घोषित केला जाण्याची शक्यता आहे. दिल्ली शहरात कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
https://twitter.com/ArvindKejriwal/status/1478194868853694470?t=yHXXQWNI_5KTmrspaYkISA&s=19