राज्यातील आणखी दोन आमदार कोरोना बाधित
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील विविध पक्षांचे नेते आणि मंत्री एका कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेस आमदार धिरज देशमुख या दोघांनाही आता कोरोनाची लागण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशी माहिती त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितली आहे.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1478040040307523586?t=OI160kDCrbu21NQfYfNUQA&s=19
“तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!” असे ट्वीट रोहित पवार यांनी केलं.
https://twitter.com/MeDeshmukh/status/1477992691308773376?t=knPQutVECu8ad6K4MWFpLA&s=19
“माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.” असं ट्विट धीरज देशमुख यांनी करून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितलं.